Sunday, August 31, 2025 06:26:40 AM

High BP Treament Tool: आता ऑनलाइन टूल्सद्वारे काही मिनिटांत करता येणार उच्च रक्तदाबावर उपचार

भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी एकत्र येऊन ‘ब्लड प्रेशर ट्रीटमेंट इफेक्टिव्हनेस कॅल्क्युलेटर’ नावाचे एक नवे ऑनलाइन साधन विकसित केले आहे.

high bp treament tool आता ऑनलाइन टूल्सद्वारे काही मिनिटांत करता येणार उच्च रक्तदाबावर उपचार

Blood Pressure Treatment Calculator: उच्च रक्तदाब हा आज जगातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानांपैकी एक मानला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. रुग्णांना याची माहिती मिळेपर्यंत त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात, ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे आजार यांचा समावेश होतो. सध्या जगभरात सुमारे 1.3 अब्ज लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. तसेच दरवर्षी सुमारे 1 कोटी लोक यामुळे मृत्युमुखी पडतात.

या पार्श्वभूमीवर भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी एकत्र येऊन ‘ब्लड प्रेशर ट्रीटमेंट इफेक्टिव्हनेस कॅल्क्युलेटर’ नावाचे एक नवे ऑनलाइन साधन विकसित केले आहे. हे साधन डॉक्टरांना रुग्णासाठी सर्वात योग्य औषध आणि डोस ठरवण्यासाठी मदत करेल.

हेही वाचा - Never Keep These Food Items In Fridge : हे 5 पदार्थ कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका; आरोग्यावर होतील भयंकर परिणाम

कसे काम करते हे साधन?

संशोधकांनी 500 हून अधिक मोठ्या वैद्यकीय चाचण्या आणि 1 लाखाहून अधिक रुग्णांचा डेटा अभ्यासून या साधनाची निर्मिती केली आहे. यामुळे डॉक्टरांना कोणत्या औषधाचा कोणत्या रुग्णावर किती परिणाम होईल याचा अंदाज घेता येईल. सामान्यपणे डॉक्टर जे औषध देतात, ते रक्तदाब केवळ 8-9 mmHg ने कमी करते. मात्र बहुतेक रुग्णांना 15-30 mmHg कपात करण्याची गरज असते. योग्य औषध व योग्य डोस निवडणे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हेच या कॅल्क्युलेटरमुळे शक्य होणार आहे.

हेही वाचा - Breast Cancer: 'हा' सामान्य आजार स्तनाच्या कर्करोगाला बनवतो आणखी प्राणघातक; नवीन अभ्यासातून खुलासा

स्मार्ट कॅल्क्युलेटरची वैशिष्ट्ये - 

औषधांचे परिणाम कमी, मध्यम आणि उच्च तीव्रतेनुसार विभागलेले असतील.
डॉक्टर सुरुवातीपासूनच योग्य औषध आणि योग्य डोस देऊ शकतील.
रुग्णांना ट्रायल-अँड-एरर पद्धतीचा त्रास होणार नाही.
दीर्घकाळात हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनी रोगांपासून लाखो जीव वाचण्याची शक्यता.

तज्ञांच्या मते, हे साधन वापरात आल्यानंतर उच्च रक्तदाबाच्या उपचारांची पद्धतच बदलू शकते. रुग्णांना सुरुवातीपासून प्रभावी उपचार मिळाल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही कमी होईल. 

(Disclaimer: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री