होळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सण आहे. या काळात भारतातील विविध राज्यात अनेकजण एकमेकांवर विविध रंग उधळून 'बुरा ना मानो होली हैं' असे म्हणतात. या काळात अनेकजण होळी खेळण्यासाठी मथुरा किंवा वृन्दावनला जातात. अशातच अनेक महिला प्रवासी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा आपल्या कुटुंबियांसोबत होळी खेळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मात्र इथे लाखोंच्या संख्येमध्ये प्रवासी येतात. त्यामुळे अनेक भारतीय किंवा परप्रांतीय महिला प्रवाश्यांना गोंधळ होऊ शकतो. बऱ्याचदा काही प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाश्यांसोबत गैरवर्तन करतात. त्यामुळे होळीनिमित्त जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर अशाप्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता.
हेही वाचा: Benefits of Not Using Oil In Foods: महिनाभर जेवणात तेल न वापरल्यास होतील अनेक फायदे
1 - उत्सव साजरा करण्यासाठी योग्य जागा निवडा:
सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरा करण्याचे आयोजन करतात. भारतातील मथुरा आणि वृंदावन यासारख्या ठिकाणी भव्य आणि पारंपारिक उत्सवांचे आयोजन करतात. त्यामुळे तिथे लाखोंच्या संख्येने जमाव निर्माण होतो. त्यामुळे जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी होळी खेळण्यासाठी विचार करत आहात तर तुम्हाला असे ठिकाण शोधायला पाहिजे जे सुरक्षित आहे. अनेक नामांकित हॉटेल्स होळीचे नियोजन करतात. अशाठिकाणी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत सुरक्षितपणे होळी खेळू शकता.
२ - योग्य कपडे घाला:
मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत होळी खेळायला जाण्यापूर्वी आरामदायक कपडे परिधान करा. लाल, जांभळा, हिरवा अशाप्रकारच्या डार्क रंगाचे कपडे कपडे परिधान करू शकता.
हेही वाचा: Alum On Face: चेहऱ्यावर तुरटी लावावी की नाही; त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या
३ - त्वचा आणि केसांची काळजी घ्या:
होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होणार नाही. कारण बाजारात विकणाऱ्या अनेक रांगांमध्ये केमिकल्स असतात, ज्यामुळे तुमची त्वचा बिघडू शकते. बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर नारळाचे तेल लावा. ज्यामुळे रंग लवकर निघते.
४ - सतर्क राहा:
सार्वजनिक ठिकाणी होळी खेळायला जाण्यापूर्वी एकटे जाणे टाळावे. शक्यतो होळी खेळायला जाताना आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत जावे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता. अनोळख्या रस्त्यांवर जाणे टाळा. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर विश्वसनीय किंवा सुरक्षित ठिकाणी जा. कोणत्याही अनोळख्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेऊ नका. अशा परिस्थितीत न घाबरता खंबीर राहावे.