मुंबई : मोसंबी (Sweet Lime) हा रसाळ आणि पौष्टिक फळ असून त्याचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. ज्यांना मोसंबी खायला आवडतं नसेल तर त्यांनी मोसंबीचा ज्यूस नक्की ट्राय करा.
हायड्रेशन आणि थंडावा
उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस पिणे उत्तम आहे. मोसंबीचा ज्यूस शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
मोसंबीत व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्यामुळे मोसंबीचे सेवन करा. तसेच सर्दी, खोकला आणि संसर्गांपासून संरक्षण करते.
पचनासाठी फायदेशीर
मोसंबचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तर अॅसिडिटी आणि पोटातील जळजळही दूर होते.
हेही वाचा : उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी 'हा' ज्यूस नक्की ट्राय करा
त्वचेसाठी लाभदायक
त्वचा तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी मोसंबी ज्यूस फायदेशी आहे. तसेच डाग-डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
वजन नियंत्रणात ठेवतो
मोसंबी कमी कॅलरी असलेली आणि फायबरयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रित करतो
मोसंबीमधील पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.
थकवा आणि तणाव दूर करतो
मोसंबीचा ज्यूसमुळे शरीराला उर्जा मिळते आणि तणाव कमी करण्यास मदत होते.
लिव्हर डिटॉक्स करते
मोसंबीचा ज्यूस लिव्हर साफ करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करेल.
कसे प्यावे?
ताज्या मोसंबीचा रस प्या.
शक्यतो साखर न घालता प्यावा.
अन्न पचवण्यासाठी जेवणाच्या आधी किंवा नंतर 1 तासाने घ्यावा.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.