Monday, September 01, 2025 11:21:58 AM

अर्धवट झोप म्हणजे आजारांना निमंत्रण; स्लीप सायकल सुधारण्यासाठी 'हे' करा

अर्धवट झोप म्हणजे आजारांना निमंत्रण स्लीप सायकल सुधारण्यासाठी हे करा

मुंबई: बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि वेळेत जेवण किंवा झोप न घेतल्याने अनेकांना विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. तसेच, झोपेचे च्रक विस्कळीत झाल्याने, याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यामुळे, धावपळीच्या जगात पुरेशी झोप घेणे हे अनेक लोकांसाठी आव्हान बनले आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे? अपूर्ण झोप शरीराला आजारांचे घर बनवू शकते? म्हणूनच, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. चला सविस्तर जाणून घेऊया की, कशाप्रकारे तुम्ही तुमच्या झोपेचे चक्र सुधारू शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता. 

1 - 'या' कारणामुळे झोप महत्त्वाची आहे

जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपले शरीर स्वतःला दुरुस्त आणि रिचार्ज करते. तसेच, वेळेत झोप घेतल्याने शरीरात उर्जेचा संचार होतो. इतकच नाही, तर शरीर हार्मोन्स सोडते, पेशी दुरुस्त करते. यासह, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

2 - अपूर्ण झोपेमुळे 'या' समस्या निर्माण होतात

अपूर्ण झोप झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, तणाव आणि चिंतेत वाढ होते, नैराश्याकडे आपली वाटचाल होते. तसेच, लठ्ठपणामध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता असते आणि हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीसाठी आजचा दिवस खर्चीक; जाणून घ्या

3 - 'हे' आहेत झोपेचे चक्र सुधारण्याचे मार्ग

तुमच्या झोपेची वेळ निश्चित करा. तसेच, दररोज त्याच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे, त्या वेळी तुम्हाला आपोआप झोप येईल. शक्यतो, दररोज 8 ते 9 तास झोप काढा. कारण, अपूर्ण झोपेमुळे डोकेदुखीची शक्यता वाढते. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनशैलीत व्यायाम करा. यासह, नियमितपणे शारीरिक हालचाली केल्याने रात्री चांगली झोप येते.

4 - ताण कमी करणे गरजेचे आहे

 ताण हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे, मानसिक आणि शारीरिक ताण कमी करणे गरजेचे आहे. यासह, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग, ध्यान किंवा  प्राणायाम करता, तेव्हा तुम्हाला चांगली झोप लागेल. विशेष म्हणजे, ताण कमी झाल्याने शांत झोप लागते. 

5 - स्क्रीन टाइम कमी करा

झोपण्याच्या 1 किंवा 2 तासांपूर्वी मोबाईल फोन, संगणक किंवा टीव्ही सारख्या स्क्रीनपासून दूर रहा. यातून बाहेर पडणारे रेडिएशन्स डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. ज्यामुळे, डोके दुखण्याची शक्यता वाढते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री