Causes of Irregular Menstruation: आजकाल अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास जाणवू लागला आहे. गेल्या काही वर्षांत या समस्येत झपाट्याने वाढ झाली आहे. महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल हे यामागील मुख्य कारण आहे. विशेषतः, इस्ट्रोजेन हार्मोनची वाढ पाळीतील अनियमिततेसाठी जबाबदार ठरते. सामान्यतः पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते, पण जेव्हा महिलांमध्ये याची पातळी वाढते तेव्हा शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या सुरू होतात.
वाढलेल्या इस्ट्रोजेनची लक्षणे
अनियमित किंवा जास्त रक्तस्त्राव
स्तनांमध्ये सूज व वेदना
मूड स्विंग, चिडचिड आणि चिंता
वजन वाढणे
थकवा, डोकेदुखी आणि निद्रानाश
स्थूलपणा व लठ्ठपणा
केस गळणे किंवा शरीरावर जास्त केसांची वाढ
हेही वाचा - Vitamin Deficiency: रात्री नीट झोप लागत नाही? असू शकते 'या' विटामिन्सची कमतरता
इस्ट्रोजेन वाढण्याची कारणे
लठ्ठपणा - वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेनचे उत्पादन वाढते आणि त्याचे उत्सर्जन मंदावते. त्यामुळे हार्मोनचे प्रमाण असंतुलित राहते.
खराब खाण्याच्या सवयी - प्रक्रिया केलेले अन्न, साखरेचे जास्त सेवन यामुळे हार्मोनल असंतुलन वाढते. अल्कोहोलमुळे यकृतावर ताण येतो आणि इस्ट्रोजेनचे चयापचय बिघडते.
तणाव आणि झोपेचा अभाव - जास्त ताणामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्याचा थेट परिणाम इस्ट्रोजेनच्या पातळीवर होतो. पुरेशी झोप न मिळाल्यानेही हार्मोनल संतुलन ढासळते.
हार्मोनल औषधे - गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळेही इस्ट्रोजेन वाढू शकतो.
हेही वाचा - Curd And Buttermilk Benefits: दही की ताक? पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?
जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य तपासणीनंतर डॉक्टर जीवनशैलीत बदल, संतुलित आहार, व्यायाम किंवा आवश्यक ते उपचार सुचवू शकतात.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)