मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. येवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. औरंगजेबाची कबर, कुंभमेळा आणि नदी प्रदूषण त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. 'मी कुंभमेळ्याचा अपमान केला नाही' आपल्याकडील नद्यांची भीषण अवस्था, 33 हजार कोटी गंगा स्वच्छ करण्यासाठी खर्च, घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकतात, हा कुठला धर्म ? असा प्रश्न उपस्थित करत 'धर्माच्या नावाखाली नद्या प्रदूषित करत आहोत' असं राज ठाकरे म्हणालेत.
हेही वाचा: शहाजी बापूंनी दिल गाण्यातून उत्तर
त्याचबरोबर आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. असं देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर मराठी भाषेसंदर्भात बोलतांना 'मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा' 'इथे मराठीतच बोलायचं' 'नाहीतर कानाखाली बसणारच' असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारण्यात आलं. पण हे सगळं झालं कशातून?
खंडणी आणि राखेच्या पैशातून बीडमध्ये या घटना घडतात. बीडमधून राखेतून गुंड उभे राहतात. वाल्मिक कराडच्या खंडणीला विरोध केल्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मराठा आणि वंजारी असा वाद निर्माण केला गेला आणि लोकांना त्यामध्ये गुंतवलं जात आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय कधीच आणणार नाहीत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. पण तरुणांना यांनी जातीच्या राजकारणात अडकवलं आहे. असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर केलंय.