Sunday, August 31, 2025 08:55:48 AM

यशस्वी अर्थमंत्री आणि साहसी पंतप्रधान हरपला

भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्य वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

यशस्वी अर्थमंत्री आणि साहसी पंतप्रधान हरपला

दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्य वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचे पार्थिव दिल्लीतील निवास्थानी आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सिंग यांच्या कुटुंबाप्रती संवेदन व्यक्त केल्या. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही सिंग यांचं अंत्यदर्शन घेतले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या राहुल गांधींनी सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांकडूनही सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज्यातूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राची मोठी हानी असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर

 

वयाच्या 92 व्या वर्षी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मालवली. देशाचे यशस्वी अर्थमंत्री आणि साहसी पंतप्रधान म्हणून ते कायम स्मरणात राहतील.


सम्बन्धित सामग्री