लातूर: महाराष्ट्रात तळीरामांची काही कमी नाही. अशातच आता जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळतोय. लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्याच्याकडेला उघड्यावर दारू पिऊन तळीराम धुडघूस घालत असून त्याचा महिला आणि मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी 9 फेब्रुवारी रोजी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने दाखवली होती.
हेही वाचा: उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळ
या बातमीची गंभीर दखल घेत लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लातूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, लातूर शहर वाहतूक पोलीस दल आणि शिवाजीनगर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत या परिसरातील अतिक्रमणे ही हटवली आहेत. त्यामुळे 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा 'मोठा इम्पॅक्ट' पाहायला मिळत असून महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या धडक कारवाईनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी 'जय महाराष्ट्र' चे प्रतिनिधी अजय घोडके यांनी संवाद साधलाय. दरम्यान 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा हा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळाला असून उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई केलीय. लातूरच्या विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमणेही महापालिकेने हटवली असून प्रशासनाच्या कारवाईनंतर लातूरकरांमधून समाधान व्यक्त केल जातंय.