Wednesday, August 20, 2025 09:13:39 AM

Suraj Chavan vs Chhava Protest : रमीपासून सुरुवात, मारहाण अन् राडा; छावाच्या आंदोलनानंतर सूरज चव्हाण बॅकफूटवर

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचे आदेश दिले.

suraj chavan vs chhava protest  रमीपासून सुरुवात मारहाण अन् राडा छावाच्या आंदोलनानंतर सूरज चव्हाण बॅकफूटवर

मुंबई: सध्या राज्यातील राजकारण शिगेला पोहोचलं आहे. नुकताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी मिळून छावा संघटनेचे प्रतिनिधी विजय घाडगे, विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचे आदेश दिले.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. यानंतर, सुनील तटकरे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. मात्र, पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. 'भर सभागृहात खेळ खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही', असं विधान सुनील तटकरेंनी केले. तेव्हा, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले. या घटनेनंतर, राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला प्रचंड मारलं. इतकंच नाही, तर छावा संघटनेचे प्रतिनिधी विजय घाडगे, विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली.

हेही वाचा: Mumbai Train Blast Verdict: मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी 12 आरोपी निर्दोष 

लातूर बंदाची हाक

अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना बेदमपणे मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी लातूर बंदची हाक देण्यात आली. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याने जोपर्यंत सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे, सोमवारी लातूर बंद आणि बुधवारी लातूर जिल्हा बंदचं आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे.

'या' कारणामुळे वाद पेटला

रविवारी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर विधानसभेच्या सभागृहात 'जंगली रमी' खेळत होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले की, ''जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी', असा टोला रोहित पवारांनी लगावला. या घटनेनंतर अनेक नेत्यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. 

हेही वाचा: पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर'वर पीएम मोदी काय म्हणाले?

'जशास तसं उत्तर दिलं जाईल' - सुरज चव्हाण

या घटनेनंतर सूरज चव्हाण म्हणाले की, 'जे कार्यकर्ते आले होते, त्यांनी असंवैधानिक मागणी भाषेचा वापर केला आहे. तेव्हा अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच होते. तसेच त्यांनी त्यांच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे यांना दिले होते. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली. पण त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. बाहेर जात असताना असंवैधानिक भाषेतचा वापर केला. त्यामुळं आमच्याकडून अशा प्रतिक्रिया उमटल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसे उत्तर देणार असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. अंगावर पत्ते टाकणे, असंवैधानिक भाषेचा वापर करणे हे कितपत योग्य वाटतं? सत्तेत आहोत याचा अर्त आम्ही सगळेच चूक करतो असे नाही. सत्तेत आहोत याचा अर्थ आमच्या नेतृत्वावर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल'. 

छावा संघटनेचे प्रतिनिधी विजय घाडगे म्हणाले...

'कोणताही व्यक्तीगत द्वेष नव्हता, कोणतीही वैयक्तीक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रीय कृषीमंत्री बदला हे म्हणणं जर चुकीचं असेल तर अतिशय वाईट घटना आहे. मला बच्चू कडून, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील, रविकांत तुपकर यांनी फोन केले', असं विजय घाडगे म्हणाले. 'राज्यातील शेतकऱ्यांच्या पोरातला हा संताप आहे. राष्ट्रावादीची जी सत्तेची मस्ती आहे, ती मस्ती शेतकऱ्यांची पोरं फतरवल्याशिवाय राहणार नाहीत', असं देखील घाटगे म्हणाले. 'शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषीमंत्री भेटला आहे. त्याबाबात आम्ही बोलायचं नाही का? असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल', असे आवाहान यावेळी विजय घाटगे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना दिले. 

सुनील तटकरे काय म्हणाले?

'मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन कधीही करणार नाही. नेमकं काय झालं? याचा आढावा मी घेणार आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना निश्चितच समर्थनीय नाही', असं सुनील तटकरे म्हणाले.
 


सम्बन्धित सामग्री