Sunday, August 31, 2025 11:16:55 AM

मोठा खुलासा! ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतावर 15 लाख सायबर हल्ले

पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे.

मोठा खुलासा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतावर 15 लाख सायबर हल्ले
Cyber attacks on India during Operation Sindoor प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे राजकीय संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र सायबर टीमने भारतातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वेबसाइट्सवर 15 लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यासाठी जबाबदार असलेले सात अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गट ओळखले आहेत. 

केवळ 150 हल्ले यशस्वी - 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी फक्त 150 हल्ले यशस्वी झाले. भारत आणि पाकिस्तानमधील करारानंतरही, भारत सरकारच्या वेबसाइट्सना शेजारील देश तसेच बांगलादेश आणि मध्य पूर्वेकडील प्रदेशातून सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पत्रकारांना संबोधित करताना, महाराष्ट्र सायबरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हॅकर्सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील डेटा चोरी, विमान वाहतूक आणि महानगरपालिका प्रणाली हॅक आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचे दावे फेटाळून लावले. 

युद्धबंदीनंतर सायबर हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत -   

दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात असे आढळून आले की भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर, भारतातील सायबर हल्ले कमी झाले आहेत, परंतु पूर्णपणे थांबलेले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्य पूर्वेकडील देशांमधून होत आहेत. 

हेही वाचा - Robot In Indian Army : भारताचे रोबोट गाजवणार रणांगण! जाणून घ्या, रोबोटिक आर्मी लढण्यासाठी कधी तयार होईल?

'रोड ऑफ सिंदूर' म्हणजे काय?

दहशतवादाविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेल्या लष्करी कारवाईचा भाग म्हणून तयार केलेल्या 'रोड ऑफ सिंदूर' या अहवालात, राज्याच्या नोडल सायबर एजन्सीने पाकिस्तानशी संबंधित हॅकिंग गटांनी सुरू केलेल्या सायबर युद्धाची सविस्तर माहिती दिली. 

हेही वाचा - काश्मीरच्या कानाकोपऱ्यात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पोस्टर; शोधणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

हा अहवाल पोलिस महासंचालक आणि राज्य गुप्तचर विभागासह सर्व प्रमुख कायदा अंमलबजावणी संस्थांना सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, महाराष्ट्र सायबर अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितले की, हे सायबर हल्ले बांगलादेश, पाकिस्तान, मध्य पूर्व आणि एका इंडोनेशियन गटाकडून झाले आहेत. यात मालवेअर मोहिमा, डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ले आणि GPS स्पूफिंग यांचा समावेश होता. 
 


सम्बन्धित सामग्री