पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरीतील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेचे म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शंशाक हगवणे फरार असतानाच राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटातून) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला आहे.
काय म्हणाले वैष्णवीचे मामा?
यावेळी, वैष्णवीच्या मामांनी म्हणजेच उत्तम बहिरट यांनी हगवणे कुटुंबियांवर आरोप करत म्हणाले की,' वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू हा हुंडाबळीचाच प्रकार आहे'. पुढे उत्तम बहिरट म्हणाले की, 'वैष्णवी आणि शंशाक हगवणे यांच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे आता तरी त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा', अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागणी केली आहे. 'वैष्णवीचं प्रेमविवाह असल्यामुळे त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सर्वांचा तीव्र विरोध होता. परंतु वैष्णवी माझ्याकडे माझ्याजवळ येऊन म्हणायची की, ''मला शशांकसोबत लग्न करायचे आहे''. हगवणे कुटुंबीयांनी तिच्यावर जादू केली होती आणि तिला पूर्णपणे आपल्या वशमध्ये केले होते. म्हणूनच ती ऐकायला तयार होत नव्हती. शेवटी तिने शशांकसोबत लग्न केले आणि लग्नाच्या सहा महिन्यानंतर, जेव्हा हळूहळू या सर्व गोष्टी घडू लागले, तेव्हा वैष्णवी मला म्हणाली की, 'मामा, मी चूक केली'.