Friday, September 05, 2025 09:06:50 AM

Eid-e-Milad holiday : मुंबईत ईद-ए-मिलादची सुटी आता 8 सप्टेंबरला; सरकारनं काढला बदलीचा जीआर

eid-e-milad holiday  मुंबईत ईद-ए-मिलादची सुटी आता 8 सप्टेंबरला सरकारनं काढला बदलीचा जीआर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरीय जिल्ह्यांमध्ये ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी आता 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी असल्याचे जाहीर केले आहे. मुस्लिम समुदायाने 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तर अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी असून या दिवशी सार्वजनिक मिरवणुकीनंतर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाईल. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने (GAD) परिपत्रक काढून राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी 6 सप्टेंबरची सुटी कायम ठेवली असून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ती 8 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. या परिपत्रकात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, "मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी कार्यालये 5 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे खुली राहतील."

हेही वाचा : Teachers' Day 2025 Wishes: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा अनमोल खजिना! तुमच्या आवडत्या शिक्षकांना पाठवा 'या' खास शुभेच्छा


सम्बन्धित सामग्री