Asia Cup 2025: भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 आशिया कपमध्ये उतरायला सज्ज झाला आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईत पोहोचण्याचे आदेश दिले असून, 5 सप्टेंबर रोजी पहिला सराव सत्र आयसीसी अकादमीमध्ये होणार आहे.
पूल अ मध्ये भारताचा समावेश
या वर्षी भारतीय संघाला पूल अ मध्ये स्थान मिळाले आहे. यात भारताबरोबर यूएई, ओमान आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईत यूएईविरुद्ध खेळला जाणार आहे. दुबईच्या मैदानावर टीम इंडियाचा टी-20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बरोबरीचा आहे. आतापर्यंत येथे 9 सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने 5 विजय मिळवले आहेत, तर 4 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
हेही वाचा - GST Impact on IPL Ticket : क्रीडाप्रेमींच्या खिशाला फटका ! आयपीएल तिकिटांच्या किंमती वाढणार, जाणून घ्या
लाईव्ह स्ट्रीमिंग आणि प्रसारण
टीव्हीवर थेट प्रसारण: Sony Ten 1 आणि Sony Ten 3
ऑनलाइन स्ट्रीमिंग: SonyLIV अॅप आणि वेबसाइट
स्मार्ट टीव्हीवर: SonyLIV अॅपद्वारे लॉगिन करून थेट प्रक्षेपण पाहता येईल.
हेही वाचा - Amit Mishra Announces Retirement: अश्विननंतर आता लेग-स्पिनर अमित मिश्राने केली निवृत्तीची घोषणा
सामना कधी होणार?
सुरुवातीला सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता ठेवण्यात आले होते. परंतु यूएईमधील उष्णतेमुळे सामन्याची वेळ बदलून रात्री 8 वाजता करण्यात आली आहे. टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होईल. या स्पर्धेत भारतासाठी हा पहिला सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण तो पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषकासाठी सरावाचा मोठा मंच ठरेल.