Friday, September 05, 2025 10:06:02 AM

Cyber Attack On USA: अमेरिका सायबर हल्ल्याच्या चक्रात, ट्रम्प आणि JD वेंससह लाखो कॉल्स आणि फाईल्स गेल्या चोरीला; थेट चीनवर आरोप

अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला समोर आला असून, संशय चीनवर आहे.

cyber attack on usa अमेरिका सायबर हल्ल्याच्या चक्रात ट्रम्प आणि jd वेंससह लाखो कॉल्स आणि फाईल्स गेल्या चोरीला थेट चीनवर आरोप

वॉशिंग्टन: अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला समोर आला असून, संशय चीनवर आहे. हा हल्ला फक्त सामान्य नागरिकांपुरता मर्यादित नसून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेंस यांच्या वैयक्तिक माहितीवरही झाला, असा अहवाल आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला डिसेंबर 2024 मध्ये सुरु झाला आणि त्यावेळी अमेरिकेतील अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क तोडले गेले. या हल्ल्यामुळे लाखो कॉल्स, मेसेजेस आणि युजर्सच्या फाईल्सवर प्रवेश मिळवला गेला. आत्तापर्यंत कमीतकमी आठ टेलिकॉम कंपन्या या हल्ल्यापासून प्रभावित झाल्या आहेत.

सीनेट इंटेलिजन्स कमेटीचे चेअरमन मार्क वॉर्नर यांनी हा हल्ला अमेरिकेतील सर्वात गंभीर सायबर हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यानुसार हा मागील रशियन हल्ल्यांपेक्षा अनेक पटींनी मोठा आणि धोकादायक आहे.
हेही वाचा: Inga Ruginienė : ही कोणी मॉडेल नाही, 44 वर्षीय सुंदर महिला आहे 'या' देशाची पंतप्रधान

तपासानंतर स्पष्ट झाले की हा हल्ला फक्त अमेरिकेत मर्यादित नव्हता. हॅकर्सनी जगभरातील 80 हून अधिक देशांच्या सरकारी, सैन्य, लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कवर हल्ला केला. ब्रिटिश तपास एजन्सीच्या अहवालानुसार, हॅकर्सने जुनी नेटवर्क वल्नरेबिलिटीचा फायदा घेत कॉल ऐकणे, संदेश वाचणे आणि मोबाईल डिव्हाईसवरील फाईल्समध्ये प्रवेश मिळवला.

हा हल्ला ‘सॉल्ट टायफून’ नावाच्या हॅकिंग ग्रुपने केला, ज्याला पूर्वी ‘Ghost Emperor’ आणि ‘Famous Sparrow’ नावानेही ओळखले जायचे. हा ग्रुप चीनच्या गुप्तचर संस्था, मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी (MSS) शी संबंधित असल्याचे तपासात आढळले आहे.

अमेरिकेच्या आरोपानुसार, तीन चीनच्या खासगी कंपन्याही या हल्ल्यात सामील होत्या; Huanyu Tianqiong Information Technology (बीजिंग), Zhixin Ruijie Network Technology (सिचुआन), आणि Juxinhe Network Technology. जानेवारीत Juxinhe वर निर्बंध लावण्यात आले आहेत, तर उर्वरित कंपन्यांवर कारवाईची तयारी सुरु आहे.

हेही वाचा:Kim Jong Un - Putin Meet : पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी सर्व पुरावे मिटवले; Video आला समोर

सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा आहे की हा हल्ला फक्त आर्थिक डेटा चोरीपुरता मर्यादित नाही, तर अमेरिकेच्या सैन्य, राजकीय आणि निवडणूक प्रक्रियांवरही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे. माजी सीआयए अधिकारी जेनिफर इवबॅंक यांच्या मते, चीन आता 80 हून अधिक देशांच्या नेटवर्कमध्ये घुसखोरी करत असून हा जागतिक महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे.

या हल्ल्याचे सर्वात गंभीर परिणाम ट्रम्प आणि वेंस यांच्यासोबत झालेत. 2024 च्या निवडणूक कॅम्पेन दरम्यान त्यांचे कम्युनिकेशन हॅक झाले, ज्यामुळे अमेरिकेच्या कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमेरिका आणि त्याचे सहयोगी देश हल्ल्याचे तपास सुरू ठेवत आहेत. सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा आहे की भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांची संख्या वाढू शकते, ज्यामुळे जागतिक डिजिटल सुरक्षा आणखी मोठ्या आव्हानासमोर येईल.

 


सम्बन्धित सामग्री