Sunday, August 31, 2025 06:48:29 AM

मोसंबी फळगळती आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

मराठवाड्यामध्ये मोसंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका व जालना जिल्ह्याची ओळख आहे.

मोसंबी फळगळती आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: मराठवाड्यामध्ये मोसंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका व जालना जिल्ह्याची ओळख आहे. उत्तर भारतात ऐरवी मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील मोसंबीच्या जागा आता आंध्रप्रदेशातील मोसंबीने घेतली आहे. त्यामुळे मोसंबीच्या दरात घसरण झाल्याचे पाहिला मिळते आहे. 

मोसंबीचे भाव घसरले 
छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील मोसंबीला पंधराशे रुपये क्विंटलचा भाव मिळतो. छत्रपती संभाजीनगरात मोसंबीच्या दरात 48 तासांमध्ये पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. उत्तर भारतातील मार्केटने छत्रपती संभाजीनगर, जालनातील मोसंबीकडे पाठ फिरवली. मोसंबी फळगळती अन् कमी भाव यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. 

छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये 36 हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. या माध्यमातून मोसंबी बाजारपेठेत एका बहारात दिवसाला किमान 400 ते 500 टन मोसंबीची आवक होते. मात्र आता मोसंबीला 15 ते 18 हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करावी अशी मागणी देखील शेतकऱ्याने केली आहे. 

मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या बाजारपेठेला बसतो. आंबिया बहारातील मोसंबीला तुटपुंजे दर मिळाला होता, थोडी आशा आता मोसंबीच्या मृग बहरावर होती, मात्र ती आशा ही फोल ठरली. शासनाने उत्तर भारतात मोसंबी पाठवण्याचा पर्यायावर अवलंबून न राहता मोसंबी केंद्र जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उभा करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात मोसंबी उद्योग सुरू केल्यास याचा निश्चित फायदा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना होईल आणि शेतकरी अडचणीत सापडणार नाही. दरम्यान राज्य सरकारने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. 
 


सम्बन्धित सामग्री