Thursday, August 21, 2025 11:42:11 AM

लोकलमधील जाहिरातींच्या गोंगाटामुळे प्रवाशांचा संताप

अचानक मोठ्या आवाजात जाहिरात सुरू झाल्यावर काही क्षणांसाठी धक्का बसतो. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकलमधील जाहिरातींच्या गोंगाटामुळे प्रवाशांचा संताप


मध्य रेल्वेच्या लोकलमधील प्रवास आता केवळ गर्दीमुळेच नव्हे, तर मोठ्या आवाजात सुरू असलेल्या जाहिरातींमुळेही त्रासदायक ठरू लागला आहे. प्रवाशांना स्थानकांची माहिती देण्यासाठी असलेल्या उद्घोषणांसोबत आता मसाले, बँका आणि विविध उत्पादनांच्या जाहिराती कर्णकर्कश आवाजात ऐकवल्या जात आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले असून, प्रवासाचा त्रास अधिकच वाढला आहे.

अचानक मोठ्या आवाजात जाहिरात सुरू झाल्यावर काही क्षणांसाठी धक्का बसतो. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 'रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी रोजच्या आयुष्याचा भाग आहे. मात्र, आता तो शांततेत करण्याचा हक्कही हिरावला जातोय,' अशी तक्रार एका प्रवाशाने केली.

हेही वाचा : Navratna Company: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IRCTC आणि IRFC ला मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा

या जाहिरातींमुळे फक्त मानसिक त्रास होत नाही, तर काही वेळा महत्त्वाच्या उद्घोषणाही नीट ऐकू येत नाहीत. अपुऱ्या झोपेने कामावर निघालेल्या प्रवाशांसाठी हा गोंगाट अधिकच त्रासदायक ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी वाढत आहे.


सम्बन्धित सामग्री