Wednesday, August 20, 2025 05:45:42 PM

शेळी गटवाटप योजनेत घोळ; लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

बुलढाणा जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण शेळी गटवाटप योजनेत प्रचंड घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शेळी गटवाटप योजनेत घोळ लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण शेळी गटवाटप योजनेत प्रचंड घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खामगाव तालुक्यात या योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अकरा शेळ्या ऐवजी सहा ते सात शेळ्या देऊन 11 शेळ्यांसोबत फोटो काढला जात आहे. त्यामुळे पंचायत समिती अधिकारी मिली भगत करून लाभार्थ्यांची लूट करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. काही लाभार्थ्यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चांगलाच गोंधळ घालत योजना राबवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले आहे.

बुलढाण्यात पंचायत समिती अंतर्गत शेळी गटवाटप योजनेत घोळ झाल्याचे चित्र समोर आले आहे. या योजनेत एकरा शेळ्या दाखवून सात शेळ्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे लाभार्थ्यांची लूट होत आहे. काही लाभार्थ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातल्याचे दिसून आले. या योजनेच्या एका महिला लाभार्थीने प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. अडीच हजार व्याजाने काढून शेळी गटवाटप योजनेत भरले आणि अकरा शेळ्या ऐवजी सात शेळ्या दिले असल्याचे महिला लाभार्थीने सांगितले. त्याचबरोबर महिलेने प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याचे म्हणत गोंधळ घालत आक्रोश व्यक्त केला. या योजनेत लाभार्थ्यांना 11 शेळ्या वाटप करणे गरजेचे असताना सहा ते सात शेळ्या देऊन अकरा शेळ्यांसोबत फोटो का काढले जात आहेत यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.

हेही वाचा : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार

दरम्यान खामगाव पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी आर बी सोनोने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेत दोन गट आहेत. एक स्थानिक आणि दुसरा उस्मानाबादी आहे. या योजनेत एस.सी लाभार्थींना सरकारकडून 75 टक्के अनुदान मिळणार असून 25 टक्के रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागते. ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आहे. तर इतरांना 50 टक्के अनुदान असून 50 टक्के रक्कम भरावी लागते. ही योजना 68 हजार रूपयांची आहे. त्यात 3 वर्षाचा विमा 10 हजार 231 रूपयांचा आहे. असे मिळून 78 हजार 231 रूपयांची योजना असल्याचे पशुधन विकास अधिकारी सोनोने यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री