Thursday, August 21, 2025 11:26:06 AM

संभाजीनगरमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपी सुरूच; तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी केली कॉपी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे सत्र सुरूच आहे.

संभाजीनगरमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपी सुरूच तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी केली कॉपी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे सत्र सुरूच आहे. एकाच हॉलमध्ये 124 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याची माहिती समोर आली आहे. 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थ्यांची एकाच पर्यायाला टिकमार्क असल्याची माहिती आहे. जटवाडा भागातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील प्रकार समोर आला आहे. 

संभाजीनगरातील शिवराजवळील जटवाडा भागातील ओहर येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर देणाऱ्या 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रातील परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांची एकाच पर्यायावर टिकमार्क केलेले होते त्यावरून हा सामूहिक कॉपीचा प्रकार असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राचे संचालक जी. जे. जाधव यांना जिल्हा परिषदेची वैयक्तिक मान्यता नसल्याचेही स्पष्ट झाले. तसेच केंद्रात सही केलेल्या 16 पर्यवेक्षकांपैकी एकाही पर्यवेक्षकाला मान्यता नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Pune Rape Case: दत्तात्रय गाडेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. आठ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याची शिक्षण विभागाची शिफारस आहे. कॉपी पकडू नका म्हणून चक्क शिक्षण विभागाच्या पथकांनाच धमक्या देण्यात आल्या. अनेक शिक्षकही मान्यता नसलेल्याचे समोर छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरूवारी बारावीचा पेपर देत असताना 125 विद्यार्थ्यांनी एकाच हॉलमध्ये बसून कॉपी करून पेपर दिल्याची धकादायक घटना समोर आली. या अगोदर देखील अनेक ठिकाणी असे प्रकार समोर आले. त्यावरच आता शिक्षण विभाग ॲक्शन रोडवर आला असून 8 परीक्षा केंद्रांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. ज्याच्या ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले त्या ठिकाणी संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. कॉपी प्रकरणे दाबण्यासाठी आणि परीक्षा केंद्रांवर कारवाई न करण्यासाठी शिक्षण अधिकारी, कॉपी मुक्त पथके यांना पालक आणि परीक्षा केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांकडून धमक्या आल्याचे प्रकार देखील घडले असल्याचे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री