भारतात अनेकांना वेड लावलंय ते म्हणजे क्रिकेटने. शालेय अभयसक्रमात जर क्रिकेट हा विषय समाविष्ट करण्यात आला असता तर क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. त्यातच आता क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. आता अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार आहे. मुंबई विद्यापीठात पदवीधर अभ्यासक्रम सुरु होणार असून क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानात शिकण्याचा अनुभव मिळणार असून विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये पदवी घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठात आता क्रिकेट खेळावर आधारी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या साहाय्यानं या पदवीधर अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे आता क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये पदवी घेता येणार आहे. क्रिकेटच्या पदवीधर अभ्यासक्रमात मैदानाची निगा, खेळपट्टी तयार करणारे, व्हिडिओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींचा समावेश असणार आहे.
हेही वाचा: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार
क्रिकेटचा इतिहास:
क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. क्रिकेटचा शोध दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील वुडलँड्स आणि क्लिअरिंग्स असलेल्या वेल्डमध्ये राहणाऱ्या मुलांनी लावला असावा, असे तज्ञांचे मत आहे.
क्रिकेटच्या इतिहासातील काही महत्त्वाची घटना:
17 शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा प्रसार झाला.
1660 मध्ये इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर क्रिकेट हा व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला.
1597 मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर 1550 च्या सुमारास क्रिकेट खेळला गेल्याची नोंद आहे.
1844 मध्ये पहिला आंतराष्ट्रीय सामना खेळला गेला.
1877 पासून आधिकारिक रूपाने अंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट सुरू झाला.
क्रिकेट हा अकरा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये मैदानावर खेळला जाणारा बॅट-बॉल खेळ आहे. क्रिकेटमध्ये सांघिक कौशल्ये, सहकार्य, संवाद आणि जिंकणे आणि हरणे कसे हाताळायचे हे शिकणे यासारखी सामाजिक कौशल्ये विकसित होतात.
दरम्यान आता अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार असून मुंबई विद्यापीठात पदवीधर अभ्यासक्रम सुरु होणार असून क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानात शिकण्याचा अनुभव मिळणार असून विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये पदवी घेता येणार आहे.