Thursday, August 21, 2025 03:36:04 AM

नवी मुंबईत 'सांस्कृतिक महोत्सव'

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे.

नवी मुंबईत सांस्कृतिक महोत्सव

२३ ऑगस्ट, २०२४, नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नाट्य चळवळ जागी ठेऊन रसिक प्रेक्षकांना कलानुभव देण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे. १०० व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने २२ ते २५ ऑगस्ट असा ४ दिवस नवी मुंबईत रंगणारा हा 'सांस्कृतिक महोत्सव' कला रसिकांसाठी  मोठी पर्वणी ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री