Nanded Firing: नांदेड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोमवारी सकाळी नांदेड शहरात एका गुरुद्वाराबाहेर गोळीबार झाला, ज्यामध्ये तीन जण जखमी झाले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार केला. नांदेड शहरातील शहीदपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली.
हेही वाचा - संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक
प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोराने बेछूट गोळीबार केल्याने एकाच्या छातीत तर इतर दोघांच्या पाठीत गोळ्या लागल्या. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, तसेच छातीत गोळी लागलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविंद्रसिंघ राठोड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
हेही वाचा - Crime News : ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेनं असा काढला त्याचा 'काटा'
गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात भीतीचे वातावरण -
दरम्यान, अधिकारी गोळीबारामागील हेतू तपासत आहेत. तसेच संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत जखमी झालेला गुरमितसिंघ सेवादार हा एका खून प्रकरणातील आरोपी आहे. बारा दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला होता. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेस तपासत आहेत.