Tuesday, September 09, 2025 01:31:53 PM

कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकरांचं मोठं विधान

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचं विधान चर्चेत आलंय. कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी मोठं विधान केलंय.

कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ तारा भवाळकरांचं मोठं विधान

आजच्या या आधुनिक जगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. तरी आजही अनेक प्रकारची विधान महिलांविषयी केले जातात. अशातच आता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचं विधान चर्चेत आलंय. कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी मोठं विधान केलंय. कुंकू लावल्यानं मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर त्याची अधिक गरज विधवांना नाही का? असा सवाल डॉ. भवाळकर यांनी उपस्थित केलाय. 

हेही वाचा: वाळू खाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू

काय म्हणाल्या डॉ. तारा भवाळकर? 

आधुनिक पद्धतीच्या लोककलेचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेतील कार्यक्रमात बाईने कपाळाला कुंकू लावणे कसे आवश्यक आहे, त्याला विज्ञानाची शास्त्रीय जोड कशी आहे हे सांगण्यात आले. परंतु, कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे. लग्न झालेल्या बायकांना की विधवांना?. कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. मग विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार असू तर या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय?. त्यामुळे याला आम्ही ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, म्हणणार का? असा प्रश्न करत विज्ञानाच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केला.

त्याचबरोबर आज ज्या पध्दतीने माणसांचे जीवन चालले आहे, त्या पध्दतीमध्ये ‘‘जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका’’ असा प्रकार दिसतो. परंतु, असे एकीकडे म्हणायचे आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विशेषतः लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. त्याच्यामध्ये ‘तथाकथित’ शिक्षित स्त्रिया, मी ‘तथाकथित’ म्हणते मी ‘सुशिक्षित’ म्हणत नाही. तथाकथित शिक्षित स्त्रिया त्याच्यामध्ये अडकतात. लोकसंस्कृतीतल्या आणि संत स्त्रियांनी जेवढा विचार केला, स्वतःच्या जगण्याचा तेवढा विचार या शिक्षित बाया करीत नाहीत. असं ही 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्यात. 


 


सम्बन्धित सामग्री