मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छांगूर बाबा यांच्याशी संबंधित हवाला, परदेशी निधी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करत मुंबई व बलरामपूरमध्ये एकूण 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. आज पहाटे 5 वाजता ही कारवाई सुरू झाली करण्यात आली. मुंबईतील 2 आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील 14 ठिकाणी ED ने छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे शहजाद शेख नावाच्या व्यक्तीची 2 कोटींच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. हे पैसे नवीनने शहजादला दिले होते. नवीन हा छांगूर बाबाचाही जवळचा असून सध्या तो ईडीच्या रडारवर आहे.
छांगूर बाबांची परदेशात 5 बँक खाती -
ईडीच्या प्राथमिक तपासात छांगूर बाबांची दुबई, शारजाह आणि UAE मधील इतर शहरांतील 5 परदेशी बँक खाती समोर आली आहेत. या खात्यांमधून 500 कोटींहून अधिक परदेशी निधी प्राप्त झाल्याचा संशय आहे. ईडीने बाबांच्या परदेश प्रवासादरम्यान निधी कसा, केव्हा आणि कुठून आला, याचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - धर्मांतर करणाऱ्या युपीतील छागुर बाबाचं पुणे कनेक्शन उघड
छांगूर बाबाची एकूण 18 बँक खाती -
दरम्यान, छांगूर बाबांची एकूण 18 बँक खाती ईडीने शोधली असून त्यात एकत्रितपणे 100 कोटींहून अधिक रक्कम जमा असल्याचे आढळले आहे. बाबांचे सहकारी नवीन याचेही 6 हून अधिक बँक खाती सापडली आहेत. ही खाती परदेशी बँकांसाठी भारतात चालवली जातात आणि यांचा उपयोग हवालामार्गे निधी हस्तांतरणासाठी झाल्याचा ईडीला संशय आहे.
हेही वाचा - दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; मुंबईत आपत्कालीन लँडिंग
ईडीच्या माहितीनुसार, छांगूर बाबांनी आखाती देशांत सतत प्रवास करून हवालामार्गे निधी जमा केला. अनेक परदेशी व देशांतर्गत खात्यांतून थेट किंवा अप्रत्यक्षपणे करण्यात आलेले व्यवहार मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे संकेत देत आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरू असून, चांगूर बाबा व त्यांच्या नेटवर्कमधील आणखी नावं समोर येण्याची शक्यता आहे.