नाशिक: काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं होत. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे. त्यातच नाशकात शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली आहे.
त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहे. आभार दौऱ्याच्या निमित्ताने आज एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणारे. त्याआधी एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यातील हर्षुल परिसरातील हिवाळी जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर आगामी कुंभमेळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली असून बैठकीनंतर काळाराम मंदिरात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शन घेणारेत.
हेही वाचा: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणारे.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच अंतर्गत वाद देखील आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेताय हे पाहून महत्वाचं ठरणारे.
विशेष म्हणजे गेल्या 1 महिन्यात 10 माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला आहे. आज देखील उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे आजच्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कसा असेल शिंदेंचा नाशिक दौरा?
आभार दौऱ्यानिमित्त शिंदेंची नाशिकमध्ये जाहीर सभा
हर्सुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं लोकार्पण
आगामी कुंभमेळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
बैठकीनंतर काळाराम मंदिरात दर्शन
शिंदेंच्या उपस्थितीत काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता
शिंदे जाहीर सभेत काय बोलणार? याकडे लक्ष