Monday, September 01, 2025 04:59:58 AM

एका क्षणासाठी भीती, पण अखेर माणुसकी जिंकली; दीडशे फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

गावातील एका पडीक, दीडशे फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याच्या करुण आरोळ्यांनी रात्रीचं वातावरण भयावह केलं होतं. गावातील गावकऱ्यांना त्या आरोळ्या ऐकू येत

एका क्षणासाठी भीती पण अखेर माणुसकी जिंकली दीडशे फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

मालेगाव : माणुसकी अजूनही जिवंत आहे याचा जिवंत पुरावा मळवलीच्या पाटण गावात घडला. गावातील एका पडीक, दीडशे फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याच्या करुण आरोळ्यांनी रात्रीचं वातावरण भयावह केलं होतं. गावातील गावकऱ्यांना त्या आरोळ्या ऐकू येतही होत्या पण कुणाची हिंमत मात्र झाली नाही. पण अशातच गावातील काही तरुणांनी त्या आरोळ्यांचा आवाज ऐकताच धाडसाने त्या दीडशे फूट खोल विहिरीत उतरून  कुत्र्याला दोरीने व्यवस्थित बांधून  सुखरूप बाहेर काढलं. 

या धाडसी रेस्क्यू मोहिमेने संपूर्ण गावाचे आणि सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. कुत्र्याचे प्राण वाचवणाऱ्या या तरुणांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना पाहणाऱ्यांच्या मनाला भिडणारी ठरली असून, मदतीसाठी धावणाऱ्या या युवकांनी प्राण्यांप्रती असलेली आपली संवेदनशीलता आणि कळकळ दाखवली आहे.

गावकऱ्यांनी या तरुणांचे भरभरून अभिनंदन केले असून, या प्रसंगामुळे ‘माणूसपण’ काय असतं याचा प्रत्यय साऱ्यांनाच आला. सध्या सोशल मीडियावर या थरारक जीवधानाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 


सम्बन्धित सामग्री