Sunday, August 31, 2025 06:31:08 AM

पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना; तपास सुरू

घटनेच्या वेळी घरात तीन जण होते. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना तपास सुरू
Firing प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

पुणे: पुणे शहरातून गोळीबाराची घटना समोर येत आहे.  शुक्रवारी रात्री उशिरा कोंढव्यातीलथ साळुंके विहार रोडवरील शालिनी कॉटेजजवळील एका खाजगी निवासस्थानी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारात श्रीकांत कानडे यांच्या मालकीच्या घराच्या काचेच्या खिडक्यांना नुकसान झाले.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या वेळी घरात तीन जण होते. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. कोंढवा पोलीसांनी आरोपीला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद, मावळमधील पर्यटकानं NIA ला दिली माहिती

गोळीबाराच्या घटनेची माहिती देताना कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, आरोपीने एअरगनने गोळीबार केला होता. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आरोपी गोळीबार का केला? याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा - नाशिक दगडफेक पूर्वनियोजित? अपहरण प्रकरणाशी थेट संबंध उघड

दरम्यान, परिसरातील एका रहिवाशाने सांगितले की, याआधीही दोनदा याच व्यक्तीने असेच कृत्य केले होते. तसेच आवारातील एका चारचाकी वाहनाचे नुकसान केले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री