Friday, September 05, 2025 05:39:39 AM

बोटीच्या अपघातात ३ नाही तर 13 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बोटीच्या अपघातात ३ नाही तर 13 जणांचा मृत्यू मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई :गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा आयलंडकडे जात असलेल्या बोटीच्या अपघातात तीन नव्हे, तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सध्याची आकडेवारी संध्याकाळी 7.30 पर्यंत उपलब्ध होती आणि अंतिम आकडेवारी गुरुवारी सकाळी जाहीर केली जाईल.

यावेळी फडणवीस यांनी यावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, मुंबई पोलिस आणि नौदलाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. "अद्याप काही बेपत्ता किंवा मृत असलेल्या लोकांची माहिती मिळाली नाही, ती गुरुवारी सकाळी मिळेल," असं त्यांनी सांगितलं.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली.

बोट अपघाताच्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी नौदलाने नवीन इंजिनाची टेस्टिंग सुरू केली होती, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी चुकते असलेल्या सर्व घटकांवर कडक कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.या अपघातामुळे मुंबईतील पाणी वाहतूक सुरक्षा विषयक प्रश्न ऐरणीवर आले आहेत, आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री