मुंबई: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा केली आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणीचे रक्षाबंधन आनंदात जाणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
हेही वाचा: महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यामध्ये फ्री-स्टाईल राडा
मंत्री आदिती तटकरे यांची पोस्ट
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला येणार आहे. 8 ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या हप्त्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी सरकारने राज्यातील गोरगरिब महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून सरकार महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करते. अडीच लाखांच्या खालील उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकार दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करते. या लाडक्या बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रखडला होता. तो हप्ता आता 8 ऑगस्ट रोजी महिलाच्या खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात होणार आहे.