Sunday, August 31, 2025 11:47:58 AM

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाचाही समावेश

या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. गौरीकुंडच्या वरच्या भागात गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू मृतांमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाचाही समावेश
Kedarnath Helicopter Crash
Edited Image

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथहून यात्रेकरूंना घेऊन गुप्तकाशीला परतणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ धुरी खार्कजवळ कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एक जोडपे आणि त्यांच्या 23 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी अपघाताची पुष्टी केली आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. गौरीकुंडच्या वरच्या भागात गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या आर्यन कंपनीचे होते, जे सकाळी 5:17 वाजता केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी उड्डाण करत होते. दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्य होती, ज्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले आणि जंगलात पडले. नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर पडताना पाहिले. त्यानंतर त्यांनी हेल्पलाइन नंबरवर फोन करून याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. 

हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील कुटुंबाचा समावेश - 

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली आहे. पायलट कॅप्टन राजवीर, विक्रम रावत बीकेटीसी कर्मचारी, रासी उखीमठ येथील रहिवासी विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि 10 वर्षीय राशी जयस्वाल अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये

चारधाम यात्रा हेली सेवा निलंबित - 

केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातानंतर, पुढील आदेशात चारधाम यात्रेसाठी हेली सेवा निलंबित करण्यात आली आहे. युकेएडीए आणि डीजीसीएने ही बंदी घातली आहे.

हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश - 

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरोकडे सोपवली आहे. डीजीसीएने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आर्यन एव्हिएशन बेल 407 हेलिकॉप्टर व्हीटी-बीकेए क्रॅश झाले आहे. या अपघातात 5 प्रवासी, एक मुलगी आणि एक पायलट यांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवांची संख्या आधीच कमी केली आहे. DGCA पुढील कारवाईसाठी देखरेख आणि आढावा घेत आहे.


सम्बन्धित सामग्री