मुंबई : होळीच्या उत्सवात रंगांच्या आनंदाबरोबरच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आणणारे अनोखे बॅनर मुंबईतील अनेक ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ‘हॅशटॅग नो बॅड टच’ असा ठळक संदेश देणारे हे बॅनर आरंभ फाउंडेशनतर्फे लावण्यात आले आहेत.
होळी साजरी करताना महिलांवर अनेकदा नकोसा स्पर्श केला जातो, याबाबत जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच “बुरा मानव होली है अगर आपकी नियतकाली है” असा खोचक संदेशही या बॅनरवर झळकतो, जो चुकीच्या वर्तणुकीकडे बोट दाखवतो.
हेही वाचा: एकतेचे रंग आणतील नवी ऊर्जा, पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा!
आरंभ फाउंडेशनचा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. होळी हा उत्साहाचा सण आहे, मात्र तो कोणाच्याही मर्यादांचे उल्लंघन करून साजरा होऊ नये, यावर या मोहिमेद्वारे भर देण्यात आला आहे.
मुंबईकरांनी या बॅनरला भरभरून प्रतिसाद दिला असून सोशल मीडियावरही या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे.