मुंबई: होळी आणि धुळीवंदन साजरे करताना रेल्वे प्रवाशांवर फुगे किंवा प्लॅस्टिकच्या पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकल्यास कठोर कारवाई होणार आहे.भारतीय दंड संहिता 125 अंतर्गत दोषी आढळल्यास 2500 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.
रेल्वे रुळांजवळच्या वस्त्यांमधून काही जण गाड्यांवर फुगे फेकतात, यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापती होतात. विशेषतः मध्य रेल्वेच्या कुर्ला, सायन, वडाळा आणि पश्चिम रेल्वेच्या वांद्रे, माहीम परिसरात अशा घटना वाढल्या आहेत.
👉👉 हे देखील वाचा : Holi celebration guidelines: सुरक्षेसाठी पोलिसांची 'या' गोष्टींवर बंदी जाणून घ्या संपूर्ण आदेश
“प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने जनजागृती मोहीम राबवत आहोत,” असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.