Thursday, August 21, 2025 04:55:30 AM

Maharashtra Budget 2025: मुंबईत तिसरं विमानतळ; अजित पवारांची मोठी घोषणा

राज्याचे अर्थसंकल्प सादर होत असतांनाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलीय. या घोषणेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणारे.

maharashtra budget 2025 मुंबईत तिसरं विमानतळ अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्प सादर होत असतांनाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलीय. या घोषणेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणारे. मुंबईमध्ये लवकरच तिसरं विमानतळ होणार असल्याचं समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे हे तिसरं विमानतळ समृद्धी आणि बुलेट ट्रेनला जोडणार आहे. यासंदर्भांत अर्थसंकल्प सादर करतांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

काय म्हणाले अजित पवार? 

वाढवण बंदाराजवळ मुंबईचे हे तिसरं विमानतळ तयार केले जाणार आहे. या बंदराजवळच मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्टेशन देखील असणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर 'जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍त आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे.' अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. 

हेही वाचा: कांद्याचा प्रश्न सोडवा नाहीतर आंदोलन पेटेल! – विधानसभेत छगन भुजबळ आक्रमक

त्याचबरोबर 'सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे.', अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय.


सम्बन्धित सामग्री