Wednesday, August 20, 2025 12:56:36 PM

केसांमध्ये च्युइंगम अडकलाय? टेंशन घेऊ नका; हे 5 घरगुती उपाय करतील चमत्कार

च्युइंगम केसांना चिकटल्यास काळजीचं कारण नाही.स्वयंपाकघरातील सोप्या उपायांनी केस न तोडता च्युइंगम सहज काढता येतो. जाणून घ्या हे घरगुती उपाय.

केसांमध्ये च्युइंगम अडकलाय टेंशन घेऊ नका हे 5 घरगुती उपाय करतील चमत्कार

लहान मुलं च्युइंगम खाल्ल्यानंतर अनेकदा तो इथे-तिथे फेकतात आणि नकळत ते तुमच्या केसांमध्ये अडकतं. एकदा केसांना च्युइंगम चिकटला  की मोठी अडचण निर्माण होते. केस कापावे लागतील की काय, असा विचार मनात येतो. पण काळजीचं कारण नाही. केस न तोडता तुम्ही च्युइंगम सहज काढू शकता. स्वयंपाकघरातील काही सोपे उपाय तुम्हाला या प्रसंगातून वाचवू शकतात.

1. तेल आहे तर काळजी नाही
नारळाचं, ऑलिव्ह किंवा कोणतंही घरगुती तेल घ्या. च्युइंगम चिकटलेल्या भागावर ते लावून हलक्याने मालिश करा. काही मिनिटांत गम मऊ होईल आणि बोटांनी किंवा कंगव्याने ती सहज निघेल. तेलामुळे केसांचं पोषणही होईल.

2. बर्फाचा जादुई वापर
जर तेल उपलब्ध नसेल, तर बर्फ वापरू शकता. बर्फाचा छोटा तुकडा च्युइंगमवर सुमारे १० मिनिटं घासा. त्यामुळे गम कडक होईल आणि केसांपासून वेगळं करणं सोपं जाईल.

3. पीनट बटरचा हटके उपाय
थोडं विचित्र वाटेल, पण पीनट बटर केसांतील च्युइंगमसाठी उत्तम उपाय आहे. त्यातील स्निग्धपणा च्युइंगम मऊ करतो. ५ ते १० मिनिटं लावून ठेवा आणि नंतर गम हळूच काढा.

4. व्हॅसलीनही उपयोगी
व्हॅसलीन केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर च्युइंगम काढण्यासाठीही उपयुक्त आहे. भरपूर प्रमाणात लावून १० मिनिटं हलक्या हाताने चोळा. च्युइंगम मऊ होऊन निघते आणि केस सुरक्षित राहतात.

5. कंडिशनरने केस वाचवा
शेवटी, तुमच्याकडे तेल किंवा व्हॅसलीन नसेल, तरी निराश होऊ नका. केसांसाठी वापरण्यात येणारा कंडिशनर च्युइंगम सोडवण्यासाठीही उपयुक्त आहे. १० मिनिटं लावून ठेवा आणि नंतर गम बाहेर काढा.

या घरगुती उपायांनी तुम्ही केसांतील च्युइंगम सहज काढू शकता तेही केस न कापता. पुढच्या वेळी असं काही घडलं, तर घाबरू नका. फक्त हे उपाय वापरा आणि तुमचे केस सुरक्षित ठेवा.


सम्बन्धित सामग्री