Monday, September 01, 2025 12:47:53 PM

'पक्षाचा स्थापना दिवस रामनवमी असेल तर रामासारखं वागा' उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या स्थापना दिनावरून टोला लगावत म्हटलं की, 'जर रामनवमी हा तुमच्या पक्षाचा स्थापना दिवस अस

पक्षाचा स्थापना दिवस रामनवमी असेल तर रामासारखं वागा उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या स्थापना दिनावरून टोला लगावत म्हटलं की, 'जर रामनवमी हा तुमच्या पक्षाचा स्थापना दिवस असेल, तर मग वागताना रामासारखं वागा.'  

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या स्थापना दिनाच्या तारखेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. 'तुम्ही हा वर्धापन दिन तारखेनुसार साजरा करता की तिथीनुसार? की तुमच्या सोयीप्रमाणे तारीख ठरवता?” असा सवाल करत, 'आमच्या शुभेच्छा सर्वानाच आहेत, पण रामाच्या नावावर राजकारण करायचं आणि वर्तन मात्र रामाच्या विरुद्ध ठेवायचं, हे योग्य नाही,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी अजून एक मुद्दा छेडला आणि ते म्हणाले की वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर केल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ख्रिस्ती, जैन, बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर डोळा ठेवत आहेत. असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. 
 


सम्बन्धित सामग्री