Thursday, August 21, 2025 12:04:22 AM

सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता

महाराष्ट्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले. यामध्ये सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता देण्यात आली असून डान्स बार कायदा सुधारणांबाबतही चर्चा करण्यात आलीय. त्याचबरोबर काही जण अजेंडा चालवत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

हेही वाचा: 'आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील'

कॅबिनेट बैठकीतले निर्णय: 

म्हैसाळ उपसा सिंचन योजना - सौर ऊर्जा प्रकल्प
या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची मान्यता
अवर्षण प्रवण भागात 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स - 346 नवीन पद निर्मिती, खर्चाला मान्यता
सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता
राज्यातील रोपवेच्या कामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणार
त्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनला मान्यता
जळगांव - चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्प
1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता
चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290  हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
पुणे - दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी


 


सम्बन्धित सामग्री