इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. याबाबात अधिक माहिती अशी की, प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
हेही वाचा: Dhananjay Munde in Trouble: धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात
काय म्हणाले इंद्रजीत सावंत?
छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो. त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा, अशी काहीजणांची इच्छा आहे. पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला. इंद्रजित सावंत यांना फोनवरुन एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. याच पार्शवभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आलं असून प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतंय हे पाहून महत्वाचं ठरणारे.