भगवान शिवाच्या भक्तांना दरवर्षी महाशिवरात्रीची आतुरतेने प्रतीक्षा असते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र मंदिरे आणि शिवालयांमध्ये "बम बम भोले"च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालेले असते. भक्त संपूर्ण भक्तिभावाने पूजा आणि उपासनेत तल्लीन असतात. खरेतर, चतुर्दशी तिथी भगवान शिवाला समर्पित असून या दिवशी भगवान शिवाचा रुद्राभिषेक केला जातो. जाणून घेऊ काय आहे महाशिवरात्रीचे महत्त्व आणि चार प्रहरांच्या पूजेचे शुभ मुहूर्त.
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्री हा हिंदू परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. सामान्यतः हा चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव प्रकट झाले होते. तसेच, भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह देखील याच दिवशी झाला, अशी श्रद्धा आहे. या दिवशी व्रत, उपवास, मंत्रजप आणि रात्रभर जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे.
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी
महाशिवरात्रीची तिथी
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:54 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचा विशेष महत्त्व आहे, त्यामुळे 26 फेब्रुवारीच्या रात्री भगवान महादेवाची पूजा केली जाईल.
भद्रेची सावली आणि जल अर्पण करण्याचा मुहूर्त
ज्योतिषीय गणनेनुसार, यावर्षी महाशिवरात्रीला भद्रेची सावली राहणार आहे. मात्र, जाणकारांचे म्हणणे आहे की, यावेळी भद्रेचा प्रभाव पाताळ लोकात राहील आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पाताळ लोकातील भद्रेचा पृथ्वीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे शुभ मुहूर्तात भगवान महादेवाची पूजा करू शकता आणि शिवलिंगावर जल अर्पण करू शकता.
महाशिवरात्रीला जलअभिषेकासाठी शुभ मुहूर्त
महाशिवरात्री दिवशी प्रत्येक प्रहरात जलअर्पण करण्यासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध असेल. 26 फेब्रुवारीला सकाळी 06:47 ते 09:42 या वेळेत तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करू शकता. तसेच सकाळी 11:06 ते दुपारी 12:35 यावेळेतही जलाभिषेक करता येईल. दुपारी 03:25 ते संध्याकाळी 06:08 हाही जलाभिषेकासाठी शुभ मुहूर्त आहे. रात्रीच्या वेळी 08:54 ते रात्री 12:01 या वेळेत शिवलिंगाचा विशेष शृंगार केला जाऊ शकतो.
पूजेचे शुभ मुहूर्त
प्रथम प्रहर: 26 फेब्रुवारी संध्याकाळी 06:19 ते रात्री 09:26
द्वितीय प्रहर: 26 फेब्रुवारी रात्री 09:26 ते 27 फेब्रुवारी मध्यरात्री 12:34
तृतीय प्रहर: 27 फेब्रुवारी मध्यरात्री 12:34 ते पहाटे 03:41
चतुर्थ प्रहर: 27 फेब्रुवारी पहाटे 03:41 ते सकाळी 06:48
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.