iPhone17: अॅपल कंपनी सप्टेंबर २०२५ मध्ये आपली नवी iPhone 17 सिरीज सादर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यंदाच्या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा होणार असून, ग्राहकांना अधिक चांगले डिस्प्ले, प्रगत कॅमेरा टेक्नॉलॉजी आणि वेगवान प्रोसेसरचा अनुभव मिळणार आहे. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि एक नवीन मॉडेल iPhone 17 Air असा एकूण चार स्मार्टफोन्स असतील.
iPhone 17 Air: नविन आणि आकर्षक मॉडेल
iPhone 17 Air हे अॅपलच्या नवीन मालिकेतील सर्वात वेगळं वैशिष्ट्य ठरू शकतं. हे मॉडेल iPhone 17 Plus च्या जागी येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असणार असून, तो वजनाने अधिक हलका आणि डिझाईनने अधिक स्लीम असणार आहे. यामध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता असून, नवीनतम A19 चिपसेटमुळे याचा परफॉर्मन्स लक्षणीयरीत्या वाढलेला असेल.
प्रसिद्ध टिपस्टर माजिन बु यांनी iPhone 17 सिरीजच्या केसचे लिक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केल्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यांच्या मते, हे केस आधीच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत.
किंमती आणि भारतातील अपेक्षित दर
Apple यंदा iPhone 17 सिरीजच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, डिझाईनमधील मोठे बदल आणि नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ही किंमत वाढ करण्यात येणार आहे. भारतात iPhone 17 ची सुरुवातीची किंमत ₹89,900 पासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर उच्च श्रेणीतील Pro Max मॉडेलची किंमत ₹1,64,900 पर्यंत जाऊ शकते.
अमेरिकेत iPhone 17 साठी सुरुवातीचा दर $899 पासून सुरू होईल, तर दुबईत तो AED 3,799 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क आणि करांमुळे काही देशांमध्ये Pro Max मॉडेलची किंमत $2,300 पेक्षा अधिक होऊ शकते.
नवीन तंत्रज्ञान आणि अॅपलचे रणनीतीत बदल
iPhone 17 सिरीज अॅपलसाठी एक गेमचेंजर ठरू शकते. नवीन डिझाईन, Slim मॉडेल, आणि A19 चिपसारखी प्रगत वैशिष्ट्ये अॅपलला उच्च किंमतीसाठी ग्राहकांना तयार करण्यास मदत करतील. विशेषतः iPhone 17 Air हे मॉडेल अॅपलच्या प्रीमियम वर्गात एक वेगळी ओळख निर्माण करू शकते.