मुंबई: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच, जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना धमकीचे कॉल येत आहे. याबाबत आव्हाडांनी गुरूवारी 'एक्स'च्या माध्यमातून ही माहिती दिली. 'हा मेसेज मला आता विधानभवनात असतांना आला. महाराष्ट्रात काय सुरू आहे? 7218395007 ह्या नंबर वरून हा मेसेज आला', अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली.

धमकी देणारा आरोपी कोण?
'मला अर्वाच्य भाषेत जिवे मारण्याच्या धमक्या देणारा हाच तो अमर कोळी. अध्यक्ष काय कारवाई करणार?', असा थेट सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र पोलिसांना विचारला आहे.

नेमकं प्रकरण काय?
या मेसेजमध्ये आव्हाडांना 'गोपीसाहेबांशी भांडू नका' असा थेट इशारा देण्यात आला होता. यासह, काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात त्यांना गोळ्या घालण्याची किंवा त्यांना पळवून लावण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, या धमक्यांवर तसेच कायदेशीर कारवाईबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत विधान किंवा पुष्टी झालेली नाही.
विधानभवनाबाहेर जेव्हा दोन्ही आमदारांमध्ये शारीरिक आणि शाब्दिक बाचाबाची झाली होती, त्याच्या एक दिवसानंतरच ही धमकी देण्यात आली होती. माहितीनुसार, जेव्हा गोपीचंद पडळकर यांचे वाहन विधिमंडळाच्या आवारात घुसले होते, तेव्हाच ही घटना सुरू झाली होती. त्यांनी आव्हाड आणि त्यांचे सहकारी, आमदार संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. तेव्हा आव्हाड हे गेटजवळ उभे होते.