Monday, September 08, 2025 01:29:03 AM

Kalyan: केडीएमसीच्या प्रसुतीगृहात नवजात बाळाचा मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप

कल्याणमधील प्रसुतीगृहात आज सकाळी 8 च्या सुमारास नवजात  बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

kalyan केडीएमसीच्या प्रसुतीगृहात नवजात बाळाचा मृत्यू कुटुंबियांचा गंभीर आरोप

कल्याण: कल्याणमधील प्रसुतीगृहात आज सकाळी 8 च्या सुमारास नवजात  बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक दिवसाआधी तसलीमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहामध्ये महिलेला सकाळी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: Ayush Komkar: सुडाच्या भावनेतून आयुषला संपवलं, मामा वनराज आंदेकरचा खून कसा झाला?

प्रसूतीनंतर त्यांना एक मुलगी झाली. बाळाला काही कोप्लिकेशन असल्याने बाळाला डॉक्टरांनी ऑक्सिजनवर ठेवण्याचा सल्ला देत त्या बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ घातला व बाळाचा मृत्यू हा केडीएमसीच्या रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच केडीएमसी प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला असता बाळाचा पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


सम्बन्धित सामग्री