मुंबई: मुंबईतील लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. लालबागचा राजाच्या शेवटची आरती अनंत अंबांनींनी उपस्थिती पार पडली. अत्याधुनिक तराफा अरबी समुद्रात दोन ते तीन किलोमीटर आत गेल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची अखेरची झलक अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये टिपली. तर, अनेकांनी गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्ष उपस्थित लालबागच्या राजाचं विसर्जन पाहिलं.
लालबागचा राजा आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यापूर्वीच अरबी समुद्राला भरती आल्यानं विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यानं विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला. समुद्राला ओहोटी आल्यानंतर लालबागच्या राजाचा गणपती नव्या अत्याधुनिक तराफ्यावर साडे चार वाजता ठेवण्यात यश आलं होतं. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच्या उत्तर आरतीला उद्योजक अनंत अंबानी उपस्थित होते.