Monday, September 08, 2025 01:31:09 AM

Uday Samant VS Vijay Wadettiwar : 'ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही'; मंत्री उदय सामंतांचं वड्डेटीवारांना प्रत्युत्तर

'ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी समिती आहे', उदय सामंत यांनी विजय वड्डेटीवारांना उत्तर दिलंय. विजय वड्डेटीवारांनी या संदर्भात टीका केली होती. त्यावर, उदय साम

uday samant vs vijay wadettiwar  ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही मंत्री उदय सामंतांचं वड्डेटीवारांना प्रत्युत्तर

मुंबई:राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विजय वड्डेटीवार यांनी भाजप पक्षावर टीका केली. 'भारतीय जनता पक्षाची भूमिका दोन्ही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचं, दोघांनाही धुर्तपणे फिरवत ठेवायचं आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या जीआरचा आता अर्थ निघत आहे. त्यामुळे, ओबीसीचं नुकसान झालं की नाही, हे मी आज सांगणार नाही. परंतु, ओबीसीवरच हा प्रकार होत आहे. तो ओबीसीमधूनच मिळवण्यासाठी होत आहे', अशी प्रतिक्रिया विजय वड्डेटीवार यांनी दिली होती. 

हेही वाचा: Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : 'आम्हाला तातडीने प्रमाणपत्र द्या, तुमचे आभार मानू.... अन्यथा'; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, 'आपल्या सर्वांना कल्पना आहे की माराठा आरक्षणाची समिती जी प्रस्थापित झाली होती, त्यात मी स्वत: सदस्य होतो. त्यामुळे, ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं. म्हणजेच, मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट लागू करावी हा निर्णय झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्याच्या आगोदर 15 दिवस कॅबिनेटने निर्णय घेतला होता की, ओबीसी समाज यांच्या न्याय हक्कासाठी उपसमिती स्थापन झाली पाहिजे, ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो. त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यात छगन भुजबळ आहेत, पंकजा मुंडे आहेत, अतुल सावे आहेत. आमच्याकडून गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत. जशी आमची माराठा आरक्षणाची समिती आहे, तसेच, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती जाहीर केली आहे'. 


सम्बन्धित सामग्री