Monday, September 01, 2025 11:04:37 AM

Vasai Virar Building Collapse : वसई-विरारमध्ये इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

विरार पूर्वेकडील विजय नगर येथील गणपती मंदिराजवळील चार मजली इमारत कोसळली.

vasai virar building collapse  वसई-विरारमध्ये इमारत कोसळली  तिघांचा मृत्यू अनेकजण अडकल्याची भीती

महाराष्ट्रातील वसई-विरारमध्ये बुधवार 27 ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील गणपती मंदिराजवळील चार मजली इमारत कोसळली. रात्री उशिरा1 वाजता कोसळलेल्या इमारतीखाली 15 ते 20 लोक अडकल्याची भीती आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते.

विरारमधील नारंगी फाटा येथील रामू कंपाउंड येथील स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट्स नावाच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला आहे. आतापर्यंत  तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना वाचवले आहे आणि त्यांना रुग्णालयात नेले आहे.

हेही वाचा - Slab Collapse In Mira Road: मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, वडील गंभीर जखमी 

एनडीआरची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही 15 ते 20 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती आणि महानगरपालिकेने ती अतिशय धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती. 


सम्बन्धित सामग्री