Thursday, September 11, 2025 02:46:09 PM

Weather Report : 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, सतर्कतेचाही आदेश

दरम्याने समोर आलेल्या माहितीनुसार, कोकणातील महत्त्वाचे जिल्हे व मुंबई परिसरात आज कोणतेही सतर्कतेचे अलर्ट जारी केलेले नाहीत.

weather report  या जिल्ह्यांना यलो अलर्ट सतर्कतेचाही आदेश

सध्या पावसाने उसंत घेतली आहे. सध्या मुसळधार पावसाऐवजी केवळ रिपरिप बघायला मिळत आहे. काही ठीकाणी तर ऊन पडलेलेदेखील दिसून आले आहे. हेच वातावरण आजही तसेच राहणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्याने समोर आलेल्या माहितीनुसार, कोकणातील महत्त्वाचे जिल्हे व मुंबई परिसरात आज कोणतेही सतर्कतेचे अलर्ट जारी केलेले नाहीत.

त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आज वातावरण नरम राहण्याचा अंदाज आहे. पुढील 48 तास हीच स्थिती राहणार असून त्यानंतर मात्र हवापालट होईल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

हेही वाचा - Solar Eclipse 2025 : चंद्रग्रहण झालं.. आता वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार; भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या, सुतक काळ

त्याचप्रमाणे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.  


सम्बन्धित सामग्री