Thursday, September 11, 2025 06:06:44 PM

Supreme Court on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना होणारच! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे गटाची गोची?

इतर घटनांचा हवाला देत 4 एलएलबी विद्यार्थ्यांच्या याचिकेत पाकिस्तानसोबतचा सामना राष्ट्रीय भावनांची थट्टा असल्याचे म्हटले होते.

supreme court on india-pakistan match  भारत-पाकिस्तान सामना होणारच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे गटाची गोची

14 सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान टी-20 सामना रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले, 'सामना होऊ द्या. आम्ही तो थांबवणार नाही'. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि इतर घटनांचा हवाला देत 4 एलएलबी विद्यार्थ्यांच्या याचिकेत पाकिस्तानसोबतचा सामना राष्ट्रीय भावनांची थट्टा असल्याचे म्हटले होते.

गुरुवारी म्हणजे  11 सप्टेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीने सुनावणीची विनंती करण्यात आली. 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप टी-20 क्रिकेट सामना होणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्यासमोर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा- Sanjay Raut On India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना आणि शिवसेनेचं 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, नेमकं प्रकरण काय? 

खरं तर, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती केके माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला सांगितले की हा फक्त एक सामना आहे, तो होऊ द्या.  यात इतकी घाई का? सामना रविवारी आहे, मग आता काय करता येईल? याचिकाकर्त्याने सांगितले की माझा खटला कमकुवत आहे पण तो सूचीबद्ध केला पाहिजे. यावर न्यायालयाने त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला.

हेही वाचा- Nepal Gen Z Protest Update : बंडाचा फायदा कैद्यांनी घेतला! नेपाळच्या 15 तुरुंगातले 13 हजारांहून अधिक कैदी पळून गेले 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत, बीसीसीआयने आधीच परिस्थिती स्पष्ट केली होती आणि म्हटले होते की जर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही तर जागतिक स्पर्धांमध्ये बंदी घालण्यात येऊ शकते. 
 


सम्बन्धित सामग्री