Asia Cup 2025: आशिया कप 2025 टी-20 फॉरमॅटमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. भारताला ग्रुप-A मध्ये स्थान देण्यात आले असून, भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान एकाच ग्रुपमध्ये आहेत. टीम इंडिया 10 सप्टेंबरपासून आपली मोहीम सुरू करणार आहे.
भारत आणि यूएईचा सामना
भारताचा ग्रुप-A मधील पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यूएईविरुद्ध होणार आहे. टी-20 मध्ये भारत आणि यूएई यांच्यात आतापर्यंत एकच सामना पार पडला आहे. 2016 मध्ये मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने यूएईला 9 विकेटने पराभूत केले होते.
भारत विरुद्ध पाकिस्तान
ग्रुपमधील हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. 2007 पासून टी-20 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 13 सामने खेळले असून, त्यातील 9 सामने भारताने जिंकले आहेत, पाकिस्तानने 3 सामने जिंकले आणि 1 सामना बरोबरीत राहिला.
हेही वाचा - Gold Medal: भारताचा ऐतिहासिक विजय! प्रथमेश फुगेच्या तुफान कामगिरीतून जागतिक तिरंदाजीत सुवर्ण पदक
भारत विरुद्ध ओमान
टीम इंडिया 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ओमान यांच्यात हा पहिला टी-20 सामना असेल.
हेही वाचा - Asia Cup 2025: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी कप 2025 जिंकून इतिहास रचला; अंतिम फेरीत कोरियाला 4-1 ने मात
टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियाची तयारी आणि सामन्यांची रणनीती यावर सर्व चाहत्यांचे लक्ष आहे. दुबई आणि अबू धाबीतील स्टेडियम्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी सामना पाहण्याची अपेक्षा आहे. आशिया कप 2025 मध्ये भारताचा प्रवास रोमांचक ठरणार आहे.