Tuesday, September 09, 2025 11:38:25 PM

Siachen Avalanche: लडाखमध्ये सियाचीन बेस कॅम्पवर हिमस्खलन; 3 जवानांचा मृत्यू

हिमनदीच्या कठीण परिस्थितीमुळे विशेष पथके तैनात करून बचाव कार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी भारतीय सैन्य सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेत आहे.

siachen avalanche लडाखमध्ये सियाचीन बेस कॅम्पवर हिमस्खलन 3 जवानांचा मृत्यू

Avalanche In Siachen Glacier: लडाख या केंद्रशासित प्रदेशातील जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर हिमस्खलन झाले. यात तीन जवानांनी आपला जीव गमावला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी 12,000 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन बेस कॅम्प परिसरात घडला. या दुर्घटनेत दोन अग्निवीर आणि एक सैनिक अडकले होते. तातडीच्या बचाव मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

बचाव कार्य सुरू

हिमनदीच्या कठीण परिस्थितीमुळे विशेष पथके तैनात करून बचाव कार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी भारतीय सैन्य सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेत आहे. सियाचीनवरील अशा घटना नवीन नाहीत. सियाचीनमधील हिमस्खलनांचा इतिहास गंभीर आहे.

हेही वाचा - Air India Flights Canceled : नेपाळमध्ये Gen Z चा निषेध तीव्र; एअर इंडियाची दिल्ली-काठमांडू उड्डाणे रद्द

सियाचीनमधील हिमस्खलनांच्या घटना -  

2021 मध्ये हनिफ उप-सेक्टरवर हिमस्खलन होऊन दोन सैनिक शहीद झाले होते.
2019 मध्ये 18,000 फूट उंचीवर झालेल्या दुर्घटनेत चार सैनिक आणि दोन पोर्टर मृत्युमुखी पडले.
3 फेब्रुवारी 2016 रोजी 19,600 फूट उंचीवर झालेल्या मोठ्या हिमस्खलनात दहा सैनिक गाडले गेले होते. त्यात लान्स नाईक हनुमंतप्पा कोप्पड सुरुवातीला वाचले, पण नंतर अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - ISRO On Chandrayan 4-5 : अवघ्या 2 वर्षांनी मानवाला चंद्रावर पाठवणार; इस्त्रोच्या अध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती

सियाचीन ग्लेशियरला त्याच्या अत्यंत उंची आणि प्रतिकूल वातावरणामुळे जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हटले जाते. येथील सैनिकांना शत्रूच्या कारवाईव्यतिरिक्त अनेक धोके आहेत, ज्यात हिमबाधा, हायपोक्सिया आणि हिमस्खलन यांचा समावेश आहे. 
 


सम्बन्धित सामग्री