एप्रिल महिन्यात दहशतवाद्यांनी पहलगाम येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. अशातच आशिया कपमध्ये आता 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला. या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेची महिला आघाडी 14 सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहे. 'माझं कुंकू, माझा देश' असं आंदोलन केलं जाणार आहे. मोदींना कुंकू पाठवणार असल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे.