Wednesday, September 10, 2025 03:33:51 PM

Prakash Ambedkar On BJP: '... ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे', आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केला आहे.

prakash ambedkar on bjp  ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यानंतर सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या. यामुळे मराठा समाजात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे ओबीसींमध्ये नाराजी सुरु झाली. यामुळे आता राज्याचे राजकारण तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत अससल्याचा आरोप सातत्याने सरकारवर होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  सातत्याने आरक्षणाच्या विषयावर भाष्य करत आहेत. आताही भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांसह भाजपावर केला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सातत्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पाहायला मिळत आहेत. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला पाहिजे. ओबीसीतून आरक्षण द्यायला नको अशी भूमिका आंबेडकरांनी घेतलेली पाहायला मिळते आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसींमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला सुरुवात केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा: Vice President Election Result: उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड; 452 मतांनी मिळवला विजय
'भाजप पक्ष ओबीसींचा शत्रू'
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप पक्ष ओबीसींचा शत्रू ! भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत आणि आरक्षण असूच नये असा गोंधळ घालायला त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपकडून सांगितले जाते की, आमचा डीएनए हा ओबीसी आहे. पण ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की, ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे असे आंबेडकर म्हणाले आहेत.  

 

'ओबीसींना राजकीय धोका आहे'
मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे. दोन-चार ओबीसी जिल्हा परिषदला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडीवर ओबीसी कसे निवडून येईल? असे प्रयत्न केले पाहिजे असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. पुढे बोलताना, ओबीसींना राजकीय धोका आहे हे ओळखले पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये ओबीसींनी स्वतःचा अधिकार आणि मोठ्या कष्टाने माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना 1990 ला लागू केलेला 'मंडल आयोग' वाचवणे हे ओबीसींच्या हातात असल्याचेही त्यांनी सांगितले.  


सम्बन्धित सामग्री