मुंबई: महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मागील 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की, नवीन प्रभार रचनेनुसारच निवडणुका होतील. यासह, ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका होणार आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. यामुळे, लवकरच राज्यातील निवडणुकांची घोषणा होणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तसेच, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिली की, 'सर्वप्रथम जिल्हा परिषद आणि त्यानंतर, पंचायत समितींच्या निवडणूका होतील'.
हेही वाचा: Chhtrapati Sambhajinagar Crime : आईचा मोबाईल देण्यास नकार, अल्पवयीन मुलाची डोंगरावरून उडी
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'ओबीसी आरक्षणासंदर्भातील या निकालाचे दोन अर्थ आहेत. मागील निर्णयात जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या, अशी माहिती न्यायालयाने दिली होती. तेच डायरेक्शन आता कन्फर्म झाले आहे. यामुळे, या निवडणुकीत ओबीसी आरक्षण पूर्णपणे राहणार आहे. यासह, सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, 2022 प्रमाणे नसून 2017 प्रमाणेच निवडणूक होतील. त्यामुळे, राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केले आहेत. ओबीसी आरक्षणासोबतच, ओबीसी आरक्षणासह या निवडणूका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली'.
हेही वाचा: Pune News : पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच विसर्जन मिरवणुकीबाबत वाद?
मंत्री संजय शिरसाठांची प्रति्किया
राज्यातील नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्रभाग रचनांचे काम जवळपास पूर्ण झाले असून 6 तारखेला राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे हे दाखल करतील, अशी माझी माहिती आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घेतील, असा अंदाज आहे', अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.